१८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे दिले बंधपत्र
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील हैबतपूर येथे मंगळवारी दुपारी होणारा एक बालविवाह गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊसांनी अत्यंत तत्परता दाखवून ऐनवेळी रोखला. मुलीच्या कुटुंबीयांचे यशस्वी समुपदेशन करत मुलगी होईपर्यंत तिचा विवाह लावून देणार नाही, असे लेखी वचनपत्र गंगापूर पोलिसांनी पालकांकडून लिहून घेतले आहे.
१८ वर्षांची हैबतपूर येथील १७ वर्षे ८ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह माळी पिंपळगाव (जि. अहिल्यानगर) येथील २१ वर्षीय तरुणासोबत निश्चित झाला होता. हैबतपूर परिसरातील अगस्त्य महाराज मंदिराजवळ हा विवाह सोहळा पार पडणार होता. वऱ्हाडी मंडळी गावातून निघण्याच्या तयारीत असतानाच याची माहिती गुप्त खबऱ्याद्वारे गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोनि. सलीम चाऊस, मनोज घोडके व महिला पोलिस तारगड यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक पोलिस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका व शिक्षकांच्या मदतीने नातेवाईक आणि पालकांचे बालविवाह रोखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील संधींवर विपरीत परिणाम करू शकतो. हैबतपूर येथे माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पालकांचे समुपदेशन केले. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे पालकांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. बालविवाहाला कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन देऊ नये. बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे पटवून दिल्यानंतर मुलाकडील मंडळींनी येणे थांबवले आणि हा विवाह टळला. मुलीचे वय
१८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचे लग्न करणार नाही, तसेच तिचे शिक्षण व संगोपन व्यवस्थित करू, असे बंधपत्र मुलीच्या पालकांनी गंगापूर पोलिसांना समुपदेशन केले.
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक गंगापूर












